कल्याण—डोंबिवलीत भगवी लाट... उद्धव ठाकरे यांचे तुफानी भाषण
बाटगे आणि सुपारीबाजांना तोंडावर आपटा!कल्याण, दि. 29 (प्रतिनिधी) - कल्याण-डोंबिवली आज भगव्या तेजाने उजळून निघाले. तमाम गर्दीच्या साक्षीने शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त तुफानी भाषणात ठणकावले. कल्याण-डोंबिवली शिवसेनेकडून हिसकावून घेणे त्रिवार अशक्य! कॉंग्रेसच्या अस्सल नेत्यांमध्ये इथे येण्याची हिंमत नाही म्हणून त्यांनी गद्दार बाटगे आणि घरफोड्या सुपारीबाजांना कल्याण-डोंबिवलीत सोडलंय, पण शिवसेनेशी हरामखोरी करणार्यांना जनता कदापि माफ करणार नाही, असा ठाकरी भाषेत समाचार घेतानाच हिंदुत्वाच्या या बालेकिल्ल्यात बाटगा नारोबा आणि मनसेच्या सुपारीबाजांना तोंडावर आपटा आणि कल्याण-डोंबिवलीवर शिवरायांचा भगवा डौलाने फडकवा, असे जबरदस्त आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले तेव्हा तमाम जनसागराने ‘जय भवानी जय शिवाजी’चा गगनभेदी गजर केला. उद्धव ठाकरे यांची डोंबिवली येथील फडके रोडवर विराट जाहीर सभा झाली................
No comments:
Post a Comment